धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात 18 दुचाकींची चोरी : चोरटे निजामपूर पोलिसांच्या जाळ्यात

18 two-wheelers stolen in Nandurbar district including Dhule: Thieves caught by Nizampur police निजामपूर, ता.धुळे (28 ऑगस्ट 2025) : निजामपूर पोलिसांनी दुचाकी चोरी करणार्‍या अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून नऊ लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 18 दुचाकी जप्त केल्या आहेत. आमोदे-आगरपाडा रस्त्यावरील जोगीदेव डोंगराजवळ ही कारवाई करण्यात आली. अनिल अभिमन भिल (पवार, साळवे, ता.शिंदखेडा) व शांताराम मन्साराम मोरे (वेहेरगाव, ता.साक्री) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
निजामपूर पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली असताना चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर आरोपींचे साथीदार अजय कोळी, चोख्या उर्फ सावकार कोळी (साळवे, ता.शिंदखेडा) व भुर्‍या पाटील (लोणखेडा) यांच्या मदतीने आरोपींनी 18 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने या दुचाकी जप्त करण्यात आल्या मात्र साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपींनी या दुचाकी धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातून चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक एस.आर.बांबळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, निजामपुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, सहा.निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भामरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड, संजय पाटील, रुपसिंग वळवी, कलीम शेख, हवालदार प्रदीपकुमार आखाडे, हवालदार प्रशांत ठाकुर, हवालदार नारायण माळचे, हवालदार रतन मोरे, हवालदार नागेश्वर सोनवणे, हवालदार प्रदीप आखाडे, नाईक खंडेराव पवार, कॉन्स्टेबल दीपक महाले, कॉन्स्टेबल राकेश महाले, कॉन्स्टेबल गौतम अहिरे, कॉन्स्टेबल मुकेश दुरगुडे, कॉन्स्टेबल पृथ्वीराज शिंदे, कॉन्स्टेबल सागर थाटसिंगारे, कॉन्स्टेबल कृष्णा भिल, कॉन्स्टेबल परमेश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल सुनील अहिरे, कॉन्स्टेबल अर्जुन पवार, कॉन्स्टेबल सागर कांगणे, कॉन्स्टेबल टीलु पावरा, कॉन्स्टेबल श्रीराम पदमर, चालक कॉन्स्टेबल मोहन माळी आदींच्या पथकाने केली.