पश्चिम बंगालच्या कारागीराचा जळगावातील सुवर्ण व्यावसायीकाला 14 लाखांचा चुना

Goldsmith in Jalgaon sells jewellery worth Rs 14 lakhs जळगाव (5 ऑक्टोबर 2025) : पश्चिम बंगालमधील सुवर्ण कारागीर 14 लाखांचे दागिने घेवून जळगावातून पसार झाला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सराफा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्समध्ये बिस्वजीत बनेस्वर सासमल (रिधुरवाडा, मुळ रा. वार्ड नं. 10 जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) हा कारागीर कामाला होते.

त्याच्याकडे दागिने घडवण्यासाठी तीन लाख 72 हजार किंमतीचा 31 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याचा एक तुकडा, पाच लाख 18 हजार किमतीचे अंदाजे 47 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटची सोन्याची लगड, दोन लाख 98 हजार किंमतीची अंदाजे 27 ग्रॅम वजनाची 22 कॅरेटची सोन्याची लगड, दोन लाख 10 हजार िंमतीचे अंदाजे 19 ग्रॅम वजनाची 22 कॅरेटची सोन्याची लगड मिळून 13 लाख 98 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल संशयिताने लंपास केला. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.