करमाळ्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघातात तिघे ठार

Terrible accident in Innova car: Three killed on the spot सोलापूर (5 ऑक्टोबर 2025) : भरधाव इनोव्हा कार व दुचाकीत झालेल्या धडकेनंतर दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ घडला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातात मोटारसायकलवरील हनुमंत केरु फलफले (35), कांचन केरु फलफले (30, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होवू शकली नाही.