बसमध्ये चढतांना वृध्द महिलेची 64 हजारांची सोन्याची पोत लंपास

Taking advantage of the crowd, an old woman’s gold vessel worth 64 thousand was dragged into Dharangaon धरणगाव (5 ऑक्टोबर 2025) : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या 70 वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यातील सुमारे 64 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबवली. धरणगाव पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले वृद्धेसोबत ?
बेबाबाई आनंद वाघमारे (70, रा.गौतम नगर, धरणगाव) या शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धरणगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अलगदपणे लंपास केली. या पोतीची किंमत अंदाजे 64 हजार रुपये आहे.

पोत चोरी झाल्याचे लक्षात येताच वाघमारे यांनी बसस्थानकात आणि परिसरात सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, दुपारी दोन वाजता त्यांनी थेट धरणगाव पोलिसात तक्राद दिली. तपास पोलिस हवालदार जितेंद्र चव्हाण करीत आहेत.