राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी धर्मराज तायडे

Dharmaraj Tayde appointed as NCP District General Secretary भुसावळ (5 ऑक्टोबर 2025) : शहरातील रहिवासी धर्मराज तायडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
माजी मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील : तायडे
पक्ष अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रत्न्यशील राहू तसेच व पक्ष वाढवण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस नूतन जिल्हा सरचिटणीस धर्मराज तायडे यांनी व्यक्त केला.

तायडे यांच्या निवडीनंतर भुसावळ शहर, तालुका व जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.