स्वामी प्रेमदास थल्हा दरबारतर्फे भुसावळात निःशुल्क औषध वितरण शिबिर

भुसावळ (5 ऑक्टोबर 2025) : शहरातील सिंधी कॉलनीत स्वामी प्रेमदास थल्हा दरबार, बडोदा (गुजरात) यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 26 वर्षे सुरू असलेले निःशुल्क श्वांस, दमा, खोकला, अस्थमा निदान शिबिर यंदाही मंगळवार, 7 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आयोजित केले आहे.या शिबिरात चित्रकूटची औषधी बूटी रुग्णांना मोफत दिली जाणार आहे. योजनेनुसार रुग्णांना तीन टप्प्यांत अर्थात तीन पोर्णिमेला औषधाचे डोस देण्यात येणार आहेत.

प्रथम औषध हे (शरद पौर्णिमा रात्र) मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी देण्यात येईल. याची नोंदणी दि. 5 व 6 ऑक्टोबरला दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत केली जाईल.

दुसरे औषध हे बुधवार, 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेच्या रात्री दिले जाईल. यासाठी नोंदणी 3 व 4 नोव्हेंबरला करता येईल, तर तिसरे आणि शेवटचे औषध हे गुरूवार, 4 डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या रात्री दिले जाईल. यासाठी रुग्णांनी नोंदणी 2 व 3 डिसेंबरला करता येणार आहे. रुग्णांना औषध वितरण पहाटे 4 वाजता सिंधी कॉलनीतील गुरूनानक सेवा मंडळात करण्यात येणार आहे.

नोंदणीशिवाय औषध नाही
गर्भवती महिलांनी हे औषध सेवन करू नये. रुग्णांनी 9370603838 व 9423653438 या नंबरवर नाव नोंदणी करता येणार आहे. हे शिबिर केवळ भुसावळातच नव्हे, तर बडोदा, गोदरा (गुजरात), सागर, छतरपूर (म.प्र.) व चकरभाटा (छत्तीसगड) येथेही आयोजित केले जाते. रुग्णांनी पहिले नाव नोंदणी करावी, त्याशिवाय औषध मिळणार नाही, असे आयोजकांनी कळवले आहे.