विषारी औषध प्राशन करीत दोघांनी संपवले जीवन

Two people ended their lives by consuming poisonous drugs रावेर (4 सप्टेंबर 2025) : विषारी औषध प्राशन करून दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली. एका घटनेत मृत व्यक्ती कर्जबाजारी शेतकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिली घटना कुसुंबा गावातील आहेत. कुसूंब्यातील रहिवासी रवींद्र भिमसिंग पाटील (60) यांनी गुरुवारी कीटकनाशक प्राशन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथील रुग्णालयात हलवले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद झिरो नंबरने रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली. रवींद्र पाटील हे काही काळापासून आर्थिक अडचणीत असून त्यांच्यावर कर्जाचे ओझे असल्याची माहिती समोर आली आहे.

भोर गावातील शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले
दुसर्‍या घटनेत भोर गावातील शेतकरी मोहन लक्ष्मण गायकवाड (55) यांनीही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची नोंद रावेर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली. . गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली.