Bhusawal suspect deported from Jalgaon district for one year भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : सामाजिक शांततेला अडसरू ठरू पाहणार्यांविरोधात भुसावळ प्रांताधिकार्यांकडे पोलिस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील एका प्रस्तावावर अंतीम सुनावणी होवून प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी शहरातील संदीप बुधा खंडारे (24, इंदिरा नगर, जामनेर रोड) यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबत आदेश काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तर दाखल होणार गुन्हा
भुसावळ पोलिस प्रशासनाने संदीप खंडारे यास हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला व सुनावणीअंती प्रांताधिकार्यांनी सोमवार, 8 रोजी संदीप खंडारे यास जळगाव जिल्ह्याजून एक वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. हद्दपारीच्या काळात संशयीताला जिल्ह्यात प्रवेश करणार असल्यास उपविभागीय दंडाधिकारी, यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असेल. तसेच तो इतरत्र ज्या ठिकाणी राहील, तेथील पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा राहण्याचा पत्ता नोंदवणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद आहे.
दरम्यान, आगामी काळात आणखी काही उपद्रवींवर हद्दपारीची कारवाई करण्यात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.