किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग लाभार्थींना शिधा आटा किट वाटप

किनगाव बुद्रुक, ता.यावल (13 सप्टेंंबर 2025) : ग्रामपंचायत किनगाव बुद्रुक मार्फत गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी दिव्यांग लाभार्थींना ग्रामनिधीमधून शिधा आटा किट वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी, माजी सरपंच मिलिंद प्रभाकर चौधरी, सब्दल छबू तडवी, लतीफ इलायत तडवी, लूकमान कलंदर तडवी, प्रमोद रामराव पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप धनगर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे गावातील सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी यांनी दिव्यांग बांधवांच्या गरजांचा विचार करून या उपक्रमाची अंमलबजावणी केल्याने त्यांच्या कार्याचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत असून ग्रामपंचायतीची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

ग्रामनिधीचा योग्य उपयोग करून वंचित घटकांना मदत पोहोचविण्याचे हे प्रयत्न स्तुत्य असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी नमूद केले.