A young man from Bohardi in Bhusawal taluka committed suicide भुसावळ (16 सप्टेंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील बोहर्डी बु.॥ गावातील 20 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. देवानंद गजानान गोपाळ (20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

तरुणाने उचलले टोकाचे पाऊस
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवार, 15 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य रमेश रायसिंग गोपळ (65) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली.
खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार यासीन पिंजारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.