Adult dies after falling into drain: Incident in Hanuman Nagar, Jalgaon जळगाव (17 सप्टेंबर 2025) : शहरातील हनुमान नगरातील 42 वर्षीय प्रौढाचा गटारीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समोर आली. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शंकर मधुकर बाऊस्कर (42 रा.हनुमान नगर, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात नोंद
जळगाव शहरातील हनुमान नगरात शंकर बाऊस्कर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होते. सोमवार, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याच परिसरात असलेल्या गटारीत पडल्यामुळे शंकर बाऊस्कर हे गंभीर जखमी झाले. ही घटना त्यांच्या मुलाच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच वडीलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.