Online cricket betting on India-Pakistan : Two people from Bhusawal caught in the net of Crime Branch भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : जळगाव गुन्हे शाखेने शहरात क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा बेटींग घेणार्या दोघांच्या मुसक्या बांधल्या आहेत. या कारवाईने सटोडियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींकडून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकाश हुंदामल कारडा (55, सिंधी कॉलनी, भुसावळ) व रणजीत चत्रभान हंडी (35, गणपती नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव गुन्हे शाखेला शहरात क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा बेटींग घेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी वरिष्ठांना कल्पना देत प्रकाश कारडाच्या घरी छापेमारी केली व याचवेळी रणजीत हंडीदेखील सट्टा बेटींग घेत असल्याचे दोघांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, हवालदार उमाकांत पाटील, नाईक गोपाल गव्हाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल दर्शना पाटील, चालक भरत पाटील आदींच्या पथकाने केली.