Husband takes extreme step under pressure to leave family and live independently : Crime against wife and mother पुणे (23 सप्टेंबर 2025) : कुटूंबाला सोडून स्वतंत्र राहण्यासाठी पत्नीसह सासूने सातत्याने दबाव टाकल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी न पत्नीसह तिच्या आईविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय विजय साळवे (26, रा.गणेशनगर, येरवडा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचा दीपालीशी सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर दीपाली आणि तिची आई संगीता यांनी अक्षयला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास वेळोवेळी सांगितले. त्याने वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर सतत दबाब आणला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात तक्रारी देखील दिल्या. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे अक्षयने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे मुलगा अक्षयने आत्महत्या केल्याचे मृताची आई लक्ष्मी विजय साळवे (52) यांनी फिर्याद दिल्याने मयताची पत्नी दीपाली अक्षय साळवे (24), तिची आई संगीता अशोक अडागळे (रा. भगवाननगर, गेवराई, जि. बीड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस दळवी पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यात गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या अशा घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे एकाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.