Relief for 32 lakh farmers in the state : Rs 2,215 crore aid approved for crop damage मुंबई (23 सप्टेंबर 2025) : अतिवृष्टीने हाता-तोंडाचा घास हिरावलेल्या शेतकर्यांना राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा दिलासा दिला आहे. खरीप 2025 मधील पिकांच्या नुकसानीसाठी दोन हजार 215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे.

32 लाख शेतकर्यानां दिलासा
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधीत झाले. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 31 लाख 64 हजार शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या शेतकर्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे.
जून ते ऑगस्टमधील नुकसानीसाठी असणार मदत
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार आहे.
यामुळे शेतकर्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतील शेतकर्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जून 2025 ते ागस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्याकरिता ही मदत असणार आहे.
कोणत्या विभागात किती मदत?
जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी 14.29, नागपूर विभागाला 23.85 कोटी आणि अमरावती विभागाला 565.60 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे तर कोकणाला 10.53 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले होते.