Notorious criminal Sameer Kakar from Jalgaon arrested जळगाव (26 सप्टेंबर 2025) : जळगावसह तांबापुरा व मेहरुण भागात दशहत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार समीर हनीफ काकर याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई झाल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीताला पोलिसांनी पुण्यातील येरवाडा कारागृहात स्थानबध्द केले आहे.

गंभीर स्वरुपाचे गुन्हे
जळगावच्या एम.आय.डी.सी.पोलिसांच्या रेकॉर्डवरील समीर हनीफ काकर (22, रा.बिस्मील्ला चौक, तांबापुरा जळगाव) याच्याविरोधात शरीराविरुध्द चे तसेच मालाविरुध्दचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयीताची तांबापुरा मेहरुण, जळगाव परीसरात दहशत असल्याने नागरिक घाबरून होते. संशयीतासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, जबर दुखापत करणे, घरफोडी आदी प्रकारचे 13 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी संशयीताला एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले मात्र त्यानंतरही त्याच्या वागणुकीत सुधारणा न झाल्याने एमआयडीसी पोलिसांनी एम.पी.डी.ए.चा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर केला व तो जिल्हाधिकार्यांना पाठवल्यानंतर नुकताच स्थानबद्धतेचा आदेश पारीत करण्यात आला.
पुण्यात ताब्यात घेत केले स्थानबद्ध
स्थानबद्धतेच्या आदेशानंतर संशयीत पसार झाला मात्र तो पुण्यात असल्याची माहिती मिळताच त्यास पथकाने ताब्यात घेत पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, विशाल कोळी, गणेश ठाकरे, योगेश घुगे आदींच्या पथकाने केली