निंभोरा, ता.रावेर (29 सप्टेंबर 2025) : युवकांनी आत्मप्रेरित अभ्यास करावा व यश मिळवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे, असे आवाहन फैजपूर पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी व्यक्त केले. पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते

यांची मार्गदर्शन शिबिराला उपस्थिती
निंभोरा बु.॥ येथे जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा परिसरातील ग्रामीण भागातील युवकांना पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर कृषी तंत्र विद्यालयात घेण्यात आले. अध्यक्षस्थानी फैजपूर पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर होते. निंभोरा एपीआय हरिदास बोचरे यांनी प्रास्ताविक केले तर मान्यवरांचे स्वागत फौजदार अभय ढाकणे यांनी केले.
मार्गदर्शन शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून रावेर येथील वैभव देशमुख व वाघोड येथील दिनेश चौधरी उपस्थित होते. यावेळी लेखी सराव पेपर घेण्यात आला. यात प्रथम क्रमांक योगेश सदाशिव कचरे, द्वितीय धीरज रतिलाल महाजन व तृतीय वैभव कडू सावळे यांनी पटकावला.
या मार्गदर्शन शिबिराचे नियोजन फौजदार ममता तडवी, प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी व पोलिसांनी केले. आभार दीपाली पाटील यांनी मानले. होमगार्ड बांधव व कृषीतंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे व विद्यालयाचे शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.