स्लीपर डब्याखालून धूर अन् जळगावात पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा

Fire in a coach of Pushpak Express near Jalgaon : Tremors among the passengers भुसावळ (1 ऑक्टोबर 2025) : जळगाव-भुसावळ दरम्यानच्या भादली रेल्वे स्थानकादरम्यान अप पुष्पक एक्सप्रेसच्या एका स्लीपर कोचमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवार, 1 रोजी रोजी घडली. या घटनेनंतर प्रवाशांच्या गोटात प्रचंड थरकाप उडाला. आगीची माहिती लोकोपायलटला कळताच तत्काळ ट्रेन थांबवत आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत सुदैवाने जीवीतहानी टळली.

तातडीने विझवली आग
लखनऊहून मुंबईच्या दिशेने निघालेली पुष्पक एक्सप्रेस भूसावळहुन 6 किलोमीटर पुढे जळगावच्या दिशेने येत असताना बोगी नंबर 4 च्या स्लीपर डब्याच्या चाकाजळून प्रचंड धुर येवू लागला. धूर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहताच प्रवाशांनी तत्काळ ओरडून इतरांना सावध केले. या घटनेमुळे काही काळ गाडीत धावपळ उडाली. तातडीने रेल्वे कर्मचार्‍यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर कर्मचार्‍यांनी तातडीने गाडी थांबवून आग विझवण्याची मोहिम राबवली. अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

लायनर घासल्याने निघाला धूर
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बोगीच्या चाकाचा लायनर घासल्याने स्पार्क निर्माण झाला आणि त्यातून आग लागली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचार्‍यांनी तातडीने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनेनंतर गाडीला काही वेळ थांबवून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली.

प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याने पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे मात्र या घटनेमुळे 20 ते 25 मिनिटे गाडी भादली रेल्वे स्थानकानजीक थांबून होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.