पिंप्राळा मोटरसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा ; दोन सराईत आरोपी अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) :पिंप्राळा हुडको परिसरातून चोरली गेलेली मोटरसायकल प्रकरणी तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक करत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. नईम खान मुकीम खान (रा. पिंप्राळा, हुडको, जळगाव) यांची मोटरसायकल 24 मे 2025 रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 206/2025 अन्वये BNS कलम 303(2) अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीचा तपास LCB जळगाव कडून सुरू असताना गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून अझहरूद्दीन सलीम शेख (वय 19, रा. पिंप्राळा, सध्या पाळधी, ता. धरणगाव) या संशयिताचा शोध घेण्यात आला. 06 जून 2025 रोजी शोध मोहिम राबवून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्हा साथीदार अब्रार हमीद खाटीक (वय 20, रा. उमर कॉलनी, उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासोबत केल्याचे कबूल केले.

अब्रार हा यापूर्वीच एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असून तो जेलमधून सुटताच पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींसह मुद्देमाल रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमा केला. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बी. पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. हरिलाल पाटील, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे यांच्या पथकाने केली. अटक आरोपी हे सराईत व संघटित गुन्हे करणारे असून त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांचीही चौकशी सुरू आहे.