बीड हादरले : चार महिन्यांच्या बाळाला ड्रममध्ये बुडवून पित्याचीही आत्महत्या

Family dispute over alcohol : Angry father kills four-month-old baby and commits suicide गेवराई (4 ऑक्टोबर 2025) : दारू पिण्यावरून दाम्पत्यात झालेल्या वादानंतर संतप्त पित्याने चार महिन्यांच्या चिमुकल्याची ड्रममध्ये बुडवून हत्या केली व नंतर स्वतःदेखील गळफास घेतला. हृदय पिळवटून टाकणारीही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील रामनगर येथे शुक्रवारी पहाटे घडली. अमोल हौसराव सोनवणे (30) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.

सुरूवातीला दाम्पत्याने विष प्राशनाने केला आत्महत्येचा प्रयत्न
ट्रक चालक असलेल्या अमोलला दारूचे व्यसन असल्याने दाम्पत्यात सातत्याने वाद सुरू होते. दारूवरून झालेल्या वादात दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुरुवारी दुपारी दसर्‍याच्या दिवशी दोघांची रुग्णालयातून सुटी झाली. रात्री जेवण करून दोघे झोपले. त्यानंतर पहाटे तीन वाजता आईने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला स्तनपान देऊन झोपी घातले मात्र तासाभरात जाग आलेल्या पित्याने चिमुकल्याला आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमोलचे होते दुसरे लग्न
अमोल याचे पायलसोबत झालेले हे दुसरे लग्न होते. दोन वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते, मात्र काही महिन्यांतच सततच्या वादातून त्याची पहिली पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर दीड वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील पायल हिच्याशी त्याचे दुसरे लग्न केले. . पायल ही गरीब घरातील असून तिला आई नाही. चार महिन्यांपूर्वी या दांपत्याला मुलगा झाला होता. अद्याप बाळाचे बारसे झाले नव्हत, त्यामुळे त्याचे नामकरण केले नव्हते. अमोल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.