This news is important for dear sisters : If the income of the beneficiary along with the husband and father is more than 2.5 lakhs, the benefit of the scheme will be terminated! मुंबई (4 ऑक्टोबर 2025) : राज्यात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या लाडक्या बहिण योजने संदर्भात राज्यातील अनेक महिलांना आता योजनेचे पैसे येणे बंद झाले आहे. सुरूवातीला लाभार्थी महिलेला अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट होती मात्र आता लाभार्थी महिलेसह तिच्या पती व वडिलांचे उत्पन्न मिळून अडीच लाखांवर रक्कम गेल्यास लाभार्थीला योजनेचा लाभ बंद केला जात आहे.

ईकेवायसीच्या अडचणी दूर होणार !
दरम्यान, या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना महिला व बालविकास विभागाने विकसीत केलेल्या पोर्टलवर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असलीतरी तांत्रिक अडचणीमुळे ही बेवसाईट चालत नसल्याने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करून या अडचणींची नोंद घेतली आहे. ईकेवायसी प्रक्रियेत येणार्या ओटीपीसंबंधीच्या या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
ई केवायएसी प्रक्रिया आता सुलभ होणार
अदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ईकेवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ईकेवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे.
लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न तसेच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न शोधले जाईल जर महिलेचे लग्न झाले असेल तर तिच्या पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे.
तर या निकषात न बसणार्या महिला योजनेसाठी अपात्र ठरणार !
लाडकी बहीण योजनेच्या मुख्य अटीनुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. आता लाभार्थी महिलेचे स्वतःचे उत्पन्न आणि त्यासोबतच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न मिळून ते अडीच लाखांपेक्षा जास्त आढळल्यास सदर महिला अपात्र ठरवली जाईल. यापूर्वी केवळ लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यात आले होते, जे फारसे अडीच लाखांपेक्षा जास्त नव्हते त्यामुळे आता कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठीच पती किंवा वडिलांची ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे.