हिंगोणे खुर्दमध्ये बंद घरात चोरी; २५ हजारांची रोकड लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील २५ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बालचंद्र हिलाल चव्हाण हे आपल्या मुलांकडे बडोदा येथे गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावले होते. दरम्यान, शुक्रवारी (२७ जून) सकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने पुतण्याने घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले होते आणि कपाटातील रोकड गायब असल्याचे लक्षात आले.
ही चोरी २६ जून सायंकाळी पाच वाजेपासून ते २७ जून सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी प्रशांत रघुनाथ चव्हाण यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार प्रवीण सपकाळे पुढील तपास करत आहेत