भुसावळात महिलेवर तिघांचा अत्याचार : परिसरात खळबळ

भुसावळ– मुलाला घरी सोडून देतो म्हणून शहरातील खेडी रोडवरील जंगलात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.

या महिलेच्या तक्रारीनुसार, रविवार , 20 रोजी 8 ते 11 दरम्यान आरोपींनी महिलेसह मुलाला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून खेडी रस्त्यावरील जंगलात नेत तिच्यावर अत्याचार केला.

पीडीतेने घडल्या प्रकारानंतर बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडल्यानंतर तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील दोघे भाऊ असून एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निलेश देशमुख करीत आहेत.