जळगाव : जळगाव शहरातील सम्राट कॉलनी भागात राहणा-या तरुणाची आज दुपारी चाकू हल्ल्यात हत्या झाली. धीरज दत्ता हिरवाडे असे मरण पावलेल्या तर कल्पेश भटू चौधरी असे जखमी तरुणाचे नाव आहे.

आज रविवारी 27 जुलैच्या दुपारी तिन वाजेच्या सुमारास न्यु जोशी कॉलनी भागातील पाण्याच्या टाकीजवळ धिरजचा एका जणासोबत वाद झाला. या वादातून मारेक-याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या धिरज यास जीएमसी मधे दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती. एमआयडीसी पोलिस स्टेशनला या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. तर भर दिवसा चाकू हल्ला झाल्याने परिसर हादरला आहे.