चोपडा प्रतिनिधी | दुचाकीला भरधाव बोलेरो वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून हे दोन्ही जण भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील आहे.

आज सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अडावद चे चोपडा दरम्यानच्या रस्त्यावर शेतकी शाळेजवळ भीषण अपघात झाला. यात अडावदकडून चोपडा शहराच्या दिशेने जाणाऱ्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मयत हे भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी असून त्यांचे नाव महेंद्र शांताराम भोळे आणि युवराज तुकाराम तायडे असल्याचे समजते. हे दोन्ही जण मध्यप्रदेशातील भिलट बाबांच्या दर्शनासाठी जात असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.