जळगावात बारी समाजचा गुणगौरव सोहळा उत्साहात

जळगाव-प्रतिनिधी । दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समस्त वारी पंचमंडळ जळगाव यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला त्यामध्ये सुमारे 200 विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक आणि समाज बांधव उपस्थित होते तसेच समाजातील विशेष कामगिरी प्राप्त व्यक्तींचा सुद्धा सदर कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किरण नागपुरे यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे आमदार राजू मामा भोळे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात बारी पंच मंडळ अध्यक्ष अरुण बारी,आयआरएस नितीन बोडके (बारी) मा.नगरसेविका शोभाताई बारी प्रा.डॉ.नितीन बारी,समाजसेविका मंगलाताई बारी,मायाताई बारी,लतीश बारी,यशवंत बनसोडे,रजिष्टार संजय नाईक बुलढाणा शहर वाहतूक शाखा पी आय देवयानी बारी,विलास बारी, व इतर मान्यवर यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरून न जाता त्यावर मात करत विशिष्ट ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करून यश कसे संपादन करू शकतो याविषयी सौ.दीप्ती बारी आणि इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यात बहुमोल कार्य केलेले विविध मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये बाळू यशवंत पाटील,रमेश आनंदा बारी,अशोक मोतीराम बारी,भाग्यश्री नरेंद्र बारी,भरत लक्ष्मण बारी आणि कुणाल निलेश बारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दिप्ती बारी प्रस्तावना सीए राहुल पाटील (बारी)आणि आभार प्रदर्शन विजय बारी यांनी केले

सदर कार्यक्रमासाठी समस्त बारी पंच मंडळाचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले पंच मंडळाचे उपाध्यक्ष नितीन बारी,खजिनदार बालमुकुंद बारी,विजय बारी,सागर बारी,महेंद्र बारी,राजेंद्र बारी हर्षल बारी,अतुल बारी,भूषण बारी,गणेश बारी,बंटी लावणे,राहुल फुसे,राम लखन बारी आदींचे सहकार्य लाभले.