जळगाव – प्रतिनिधी । बालाजी पेठ, भवानी पेठ, बळीराम पेठ परिसरातील माहेश्वरी सभेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हास्तरीय “एक शाम देश के नाम” हा देशभक्तीपर कार्यक्रम दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी आदित्य फार्म येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात समाजातील पाच ते दहा वयोगटासाठी तसेच पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, समूहगीत गायन, जोडी नृत्य, व समूहनृत्य यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धा देशभक्ती विषयावर आधारित होत्या. यामध्ये सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्यांना मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास समाजाचे सुमारे 1000 सदस्य उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर नितीनजी लड्डा उपस्थित होते. प्रमुख प्रायोजक म्हणून आदित्य फार्म, निकम अँड लाठी असोसिएट्स, व सुप्रीम इंडस्ट्रीज यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिव लाठी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून समाजात राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशाने घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली लाहोटी व जयश्री लाठी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष प्रमोद झंवर, सचिव रमण लाहोटी, परिसर सभेचे अध्यक्ष शिव लाठी, सचिव संतोष समदाणी, प्रकल्प प्रमुख राधेश्याम सोमानी, योगिता दहाड, सह-प्रकल्प प्रमुख आनंद बिर्ला, सारिका मंडोरा तसेच कैलास लाठी, योगेश दहाड, विशाल तापडिया, तुषार सोनी, मनीष सोनी, भिकचंद झंवर, हर्षल तापडिया, सुनील कासट व राजेश नवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भोजनाने करण्यात आला.