रेव्ह पार्टी प्रकरणावर रक्षा खडसे यांची चुप्पी !

जळगाव-प्रतिनिधी । एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर गोत्यात आले असून रक्षा खडसे यांनी यावर मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीये. खराडी भागात पुणे पोलिसांनी एका पार्टीवर छापेमारी केली. पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला रंगेहात पकडले असून यावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणावर आता पहिल्यांदाच भाष्य केलंय. त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टीवर प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे या प्रकरणी बोलताना म्हणाल्या की, या सर्व गोष्टी आता न्यायालयात गेलेल्या आहेत, पोलीस सुद्धा त्याची चौकशी करत आहे, जी सत्यता आहे ती पुढे येईल.