स्व. दिलीप निकम यांना स्मृतिदिनी अभिवादन

जळगाव- प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेत आज स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या स्मृतिदिनी संस्थेच्या माजी चेअरमन शैलजाताई निकम, रितेश निकम, संचालक गजानन देशमुख, संजीव पाटील आणि रमेश आप्पा पाटील, कर्मचारी व्यवस्थापक व्ही. पी. पाटील यांच्यासह प्रकाश पाटील, जानकीराम बाविस्कर, राजू पाटील, जयवंत निकम, विजय साळुंखे, साधना घोडके, परेश दीक्षित, भगवान पाटील, मयूर पाटील, हिरामण पाटील, शेखचंद पिंजारी, महेंद्र पाटील, अमर देशमुख, भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात स्व. भाईसाहेबांच्या समाजाभिमुख कार्याचा, त्यांची नेतृत्वशैली आणि संस्थेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन अर्पण केले.