भुसावळ- शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोरील लोखंडी पुलालगत असलेल्या थोर समाजसेवक व विचारवंत साने गुरुजी यांच्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली असून,त्याचे तातडीने नूतनीकरण करण आणि,वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी तथा जनहित साध्य होण्यासाठी मराठी पत्रकार संघटनेने पुढाकार घेऊन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन दिले.

सदर स्मारकाजवळून अनेक प्रवासी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करतात.हे लोक थेट स्मारकावरून पाय पाय ठेवून विटंबना करीत स्टेशनकडे दररोज जातात स्मारकाची विटंबना होत आहे,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्मारकाचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यावश्यक असून,अवैध मार्ग त्वरित बंद करण्यात यावा,अशी संघटनेची विनंती आहे.तसेच लोखंडी पुलासमोर वाहतूक पोलिसांसाठी पूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्कल तयार करण्यात आले होते.मात्र सद्यस्थितीत त्या ठिकाणी पोलिसांना उभे राहण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. दररोज हजारो नागरिक व विद्यार्थी या मार्गाने प्रवास करत असल्याने,वाहतूक नियंत्रणासाठी पुन्हा सर्कल तयार करण्यात यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली शहरातील सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी,जेणेकरून वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मार्गदर्शनासाठी आणि संबंधित समस्या लवकरात लवकर निकाली काढाव्यात यासाठी मराठी पत्रकार संघटनेने प्रांताधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष शेलोडे, कमलेश चौधरी, विनोद गोरधे ,आकाश ढाके , वासिम शेख , मनोहर लोणे , सुरेश महाले आदीनी दिले