जळगावात श्री वीर तेजाजी महाराजांचा द्वितीय वर्ष जागरण उत्सव भक्तिभावात संपन्न

जळगाव – श्री वीर तेजाजी महाराजांचा द्वितीय वर्ष जागरण उत्सव रविवार, १० ऑगस्ट रोजी जळगावात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने संपन्न झाला. आदित्य लॉन, लोकमत पेपरसमोरील परिसर, एमआयडीसी येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक श्री नवीन दाधीच (चिंटू जी) यांनी आपल्या मधुर वाणीने तेजाजी महाराजांची स्तुतिगीते, भजने आणि जागरणाची पारंपरिक सादरीकरणे सादर करून वातावरण भक्तिमय केले.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता भोजन प्रसादीने झाली, त्यानंतर जागरणास प्रारंभ झाला. उपस्थित भाविकांनी दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा अनुभव घेतला. आयोजकांनी सांगितले की, तेजाजी महाराजांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम समाजातील एकतेचे प्रतीक ठरला.

श्री वीर तेजाजी महाराज हे राजस्थानसह भारतातील अनेक भागांमध्ये लोकदेवता म्हणून पूजले जातात. त्यांच्या शौर्य, त्याग आणि लोककल्याणकारी कार्यामुळे त्यांना भक्तांच्या मनात विशेष स्थान आहे. यंदाच्या द्वितीय वर्ष उत्सवाने भाविकांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये -अध्यक्ष : नानुराम जी कस्वाँ, उपाध्यक्ष : रामचंद्र जी ताडा, कोषाध्यक्ष : कानाराम जी नैन, सचिव : केसाराम जी मंडा, सलाहकार : हरलाल जी पलसानिया
कमिटी मेंबर : रूपाराम जाखड, लक्ष्मण बांगडवा, लीलाधर पुनिया, भंवरलाल गोदारा, रिडमल जांगु, प्रेम थोरी, महेंद्र महाराज, हेमंत मंडा, अशोक कस्वाँ, खरताराम बाना, मनोज कस्वाँ, ओमप्रकाश बांगडवा
युवा उद्योजक : मुरली कस्वाँ (सामाजिक कार्यकर्ता) आदी मान्यवर उपस्थित होते.