बारावीच्या विद्यार्थिनीवर चोपडा शहरात अत्याचार ; पीडीता गर्भवती, आरोपी तरुणाला अटक

चोपडा (27 ऑगस्ट 2025) : चोपडा शहरात शिक्षणासाठी आलेल्या बारावीच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने त्यातून ती गर्भवती राहिली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली.

असे आहे प्रकरण
शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. या मुलीवर अविनाश वेस्ता पावरा याने जानेवारी 2023 मध्ये चोपडा शहरातील शिरपुर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीच्या रुमवर चार वेळेस तसेच 26 जून 2025 रोजी सकाळी 11वा च्या सुमारास शिरपुर रोडालगत असलेल्या हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडा झुडपांममधे पीडितेवर अत्याचार केला.

पीडितेने तिच्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलिसात दिल्यानंतर अविनाश वेस्ता पावरा (अंमलवाडी, पोस्ट उमर्टी, ता.चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत.