कुख्यात अज्जू डॉनने पिस्टल दाखवत दिड लाख लूटले : सावद्याजवळील भरदिवसाचा थरार

Notorious Ajju Don looted Rs 1.5 lakhs while brandishing a pistol: Daylight thrill near Savadya सावदा, ता.रावेर (28 ऑगस्ट 2025) : भुसावळातील टायर विक्रेत्याला गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून कुख्यात अज्जू डॉनसह पाच आरोपींनी दिड लाख रुपये लूटले. ही घटना सावदा शहराजवळ बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे.

असे आहे लूट प्रकरण
भुसावळातील मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी साजीद शेख अकबर हे आपले मित्र बबलू खान अय्यूब खान यांच्यासह निंभोरा येथील एकाकडून टायरचे दीड लाखांचे पेमेंट घेऊन सावद्याहून स्कूटी (एम.एच.19 ईक्यू.2810) ने भुसावळकडे येत असताना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सावदा ते पिंपरूडच्या दरम्यान स्मशानभूमीच्या पुढे पांढर्‍या रंगाच्या तवेरा कारमधून आलेल्या संशयीतांनी दुचाकी अडवली व अज्जू डॉन बर्‍हाणपूरवाला, तौसीफ (पूर्ण नाव माहित नाही ) यांच्यासह तीन अनोळखींनी पिस्टल रोखले व सोबत असलेली दिड लाखांची रोकड लुटून पोबारा केला.

घडल्या प्रकारानंतर साजीद शेख अकबर यांनी सावदा पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्जू डॉन बर्‍हाणपूरवाला, तौसीफ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि तीन अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे आणि राहुल सानप हे करीत आहेत.