भुसावळचा कुख्यात बाबा काल्या जाळ्यात ; गुन्हे शाखेने या कारणास्तव बांधल्या मुसक्या

Bhusawal’s notorious Baba in black net; Crime Branch frowns on this reason भुसावळ (28 ऑगस्ट 2025) : जबरी लुटीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या कुख्यात आरोपी बाबा काल्याला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. जून महिन्यात घडलेल्या लूट प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार होता मात्र तो फैजपूरात आल्याची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली.

असे आहे लूट प्रकरण
भुसावळातील मुस्लीम कॉलनी भागातील 21 वर्षीय महिलेशी असभ्य वर्तन करीत आरोपी शोलू, बाबा काल्या व सादीक इबादत अली यांनी चार ते पाच हजार रुपये लूटले होते. ही घटना 7 जून 2025 रात्री सव्वा वाजता घडली होती. भुसावळ बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

कुख्यात बाबा काल्याविरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल असून तो या गुन्ह्यात पसार झाल्यानंतर फैजपूरातील हॉटेल हॉटस्पॉट येथे आल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर पथकाने आरोपीच्या सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या व त्यास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, तसेच फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या नेतृत्वातील उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, कॉन्स्टेबल जुबेर शेख आदींच्या पथकाने केली.