विद्यार्थ्यांनी अभ्यासोबतच खेळाकडे द्यावे लक्ष : रजनी सावकारे

भुसावळातील तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत वरणगावच्या महात्मा गांधी विद्यालयाचा डंका

Students should pay attention to sports along with studies: Rajani Savkare भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडेही लक्ष द्यावे व खेळातून अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्याद्वारे सेंट अलॉयसेस स्कूलमध्ये आयोजित शालेय शासकीय तालुकास्तरीय मुलींच्या 14, 17, 19, वयोगटाच्या बुद्धिबळ स्पर्धेेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या.हस्ते चेस बोर्ड वरती सोंगट्यांची चाल चालुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शालेय पोषण आहार अधीक्षक बी.डी.धाडी हे होते. प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, मेघश्याम शिंदे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू प्रशिक्षक पंच उपस्थित होते

रजनी सावकारे मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर बनले पाहिजे. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून यश संपादन करावे. जिंकलेल्या संघांनी आपल्या तालुका, जिल्हा, राज्याचे नाव उंचावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करीत त्यांना सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात डॉ.प्रदीप साखरे यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धेत 57 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल खाली याप्रमाणे.

असा आहे स्पर्धेचा निकाल : 14 वर्षाखालील वयोगट
प्रथम- )प्रियंका इंगळे (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव), द्वितीय- श्रद्धा सपकाळे (अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ), तृतीय- रिद्धी ठाकरे (द वर्ड स्कूल, भुसावळ), चतुर्थ- खुशबू तडवी (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), पाचव्या स्थानी निधी जंगले (सेंट अलायसेस, भुसावळ)

17 वर्षाखालील वयोगट
प्रथम- भाग्यश्री ओगले (अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ), द्वितीय- रुपल नेहते (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), तृतीय आर्या पवार (सेंट अलॉयसीस, भुसावळ), चतुर्थ निजिया पिंजारी (बी.झेड.उर्दू, भुसावळ), पाचव्या स्थानी सिद्धी टेंभुर्णीकर (सेंट अलायसेस)

19 वर्षे खालील मुली
प्रथम- विधीहा पाटील (महात्मा गांधी, वरणगाव), द्वितीय- आसीसफा खान, तृतीय अलेना फारुख, चतुर्थ- अल्फिया पटेल, पाचव्या स्थानी फलक अहमद (सर्व बी.झेड.कॉलेज, भुसावळ)

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
मुख्य ऑर्बिट म्हणून मिलिंद शिरोडे यांनी तर पंच म्हणून नम्रता गुरव, प्रदीप सपकाळे, लक्ष्मीकांत नेमाडे, अझर, सुमितदास गुप्ता, बॉबी पवार, तौसीफ कुरेशी, निलेश राजपूत, गणेश बोदडे, अलेस्टर सिमोन्स, दत्तु अहिरे, अजय डोळे आदींनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व सेंट अलॉयसेस स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आभार मेघश्याम शिंदे यांनी मानले.