यावल ; 57 गावात 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून श्रींची उत्साहात स्थापना

यावल (29 ऑगस्ट 2025) : शहरात 21 तर ग्रामीण भागात यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावात 72 अशा अशा एकूण 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत श्रींची उत्साहात स्थापना केली. शहरातील बाल संस्कार विद्या मंदिरातदेखील गणेशोत्सव साजरा केला जातो व शहरातुन विद्यार्थ्यांनी काढलेली श्रीच्या आगमनाची सवाद्य मिरवणूकीने नागरीकांचे लक्ष वेधले होते.

विविध मंडळात श्रीचे आमगन झाले व नंतर स्थापना करण्यात आली. तर पोलिस ठाण्यात देखील श्रीची उत्साहात स्थापना करण्यात आली.
शहरात व ग्रामिण भागात बुधवारी श्री ची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. सकाळ पासुनचं शहर व तालुक्यात श्री ची आगमन मिरवणुक सह श्रीची विधीवत स्थापनेची लगबग होती. काही ठिकाणी रात्री उशीरा पर्यंत स्थापना करण्यात आली.

शहरात श्रींच्या आगमनाची भव्य मिरवणूक बाल संस्कार विद्या मंदिर शाळेच्या वतीने काढण्यात आली होती. शाळेत दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो व यंदा देखील मोठ्या उत्साहात श्रीची स्थापना करण्यात आली. तत्पुर्वी विद्यार्थ्यांच्या सहभागाने शहरातुन काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरीकांचे लक्ष वेधले होते. विद्यार्थ्यांचे लयबध्द स्वरूपातील झांज पथक, मुलींचे कळशी पथक तसेच राणी लक्ष्मीबाई पथक,देवयानी पथक सह आदी या मिरवणुकीत सहभागी झाले.

शहर व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावात पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलिस निरिक्षक अजय वाढवे, पोलिस उपनिरिक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरिक्षक एम.जे.शेख सह कर्मचार्‍यांच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.