Nashik’s village revenue officer caught by ACB for demanding Rs 1,000 for registration of prize slip नाशिक (29 ऑगस्ट 2025) : बक्षीस पत्रकाची नोंद करून देण्याच्या मोबदल्यात एक हजारांची लाच मागण्याचा मोह ग्राममहसूल अधिकार्याच्या अंगलट आला व एसीबीने आरोपीच्या मुसक्या बांधल्या. गौरव शंकर दवंगे (31, ग्राम महसूल अधिकारी चेहडी बुद्रुक, ता.जि.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अहे आहे लाच प्रकरण
61 वर्षीय तक्रारदाराच्या बहिणीच्या मालकीचे मौजे चेहडी बुद्रुक येथील सर्वे नंबर 4/ह/प्लॉट/11 क्षेत्र 119.53 चौरस मीटर या प्लॉटची बक्षीस पत्रकाची नोंद सातबारा उतार्यावर करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी दवंगे यांनी 19 रोजी एक हजारांची लाच मागितली होती व तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवार, 28 रोजी दुपारी दोन वाजता लाचखोर दवंगे यास लाच स्वीकारताच अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा सुशीला रंगनाथ हांडोरे, पोलिस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलिस नाईक विलास निकम आदींच्या पथकाने यशस्वी केला.