Now 25 Maoists remain in Gadchiroli: Aheri Dalam ends with Jyoti’s death; Information from Superintendent of Police Nilotpal गडचिरोली (29 ऑगस्ट 2025) : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या कोपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले आहेत. तब्बल 48 तास गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या या अभियानात ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर 14 लाख रुपये बक्षीस असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अहेरी दलमची अखेरची सदस्य ज्योती कुंजाम (27, बस्तर एरिया), मालू पदा (41, बुर्गी, छत्तीसगड), क्रांती उर्फ जमूना रैनू (32, बोधीनटोला, ता.धानोरा), ज्योती कुंजाम (27, बस्तर एरिया), मंगी मडकाम (22, बस्तर एरिया) अशी ठार झालेल्या माओवाद्यांची नावे आहेत.
या मोहीमेत तब्बल साडेपाचशे सी.सिक्सटी कमांडोच्या जवानांनी भाग घेत भर पावसात नदीनाले पार करत 50 किलोमीटरचा येण्या-जाण्याचा पायी प्रवास केला. यासाठी घनदाट जंगलात तब्बल 48 तास राबवलेल्या या अभियानात आठ तास माओवाद्यांसोबत जवानांनी प्रत्यक्ष झुंज दिली. त्यात
आता 25 माओवादी
पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, या चारही माओवाद्यांवर 14 लाख रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत एक एसएलआर दोन इंसास आणि एक थ्री नाट थ्री या तीन बंदुकांसह 92 जिवंत काडतुसे आणि वॉकीटॉकी जप्त करण्यात आली. आता गडचिरोली जिल्ह्यात केवळ 25 सक्रिय सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असल्याचे नीलोत्पल म्हणाले. 25 रोजी भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील कोपर्शीच्या जंगलात नक्षली एकत्र आल्याच्या माहितीवरून यंत्रणेने सलग आठ तास कारवाई केली.
एकाचवेळी दक्षिण गडचिरोली सक्रिय कंपनीच्या दोन सदस्यांना ठार करण्यात यंत्रणेला यश आले. लवकरच जिल्हा नक्षलमुक्त होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.