सातव्या मजल्यावरून उडी घेत महिला वकीलाची आत्महत्या

महाराष्ट्रात डीजे बंदीसाठी महत्त्वाची भूमिका वठवणार्‍या अ‍ॅड.सरिता खानचंदानी यांच्या अकाली एक्झीटने हळहळ

Social activist and advocate Sarita Khanchandani डोंबिवली (29 ऑगस्ट 2025) : महाराष्ट्रात डीजेवर बंदी घालण्यात महत्त्वाची भूमिका वठवणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या व अ‍ॅड.सरिता खानचंदानी यांनी सातव्या मजल्यावर जात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही मात्र आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. अ‍ॅड.सरिता या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरला वास्तव्यास होत्या.

उपचारादरम्यान मृत्यू
डोंबिवलीमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी एका वाजता घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरिता व्यवसायाने वकील होत्या. महाराष्ट्रात डीजेवर बंदी घालण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उल्हासनगरमधून वाहणार्‍या उल्हास आणि वालधुनी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरिता यांनी काम केले. उपपोलिस आयुक्त सचिन गोरे म्हणाले की, सरिता यांनी त्यांच्या ऑफिसच्या मागची खोली एका महिलेला भाड्याने दिली होती. बुधवारी खोली रिकामी करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर महिलेने सरितावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.

सरिता हिरली फाउंडेशन नावाची संस्था चालवत होत्या. त्या उल्हासनगरमधून वाहणार्‍या उल्हास आणि वालधुनी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी काम करत होत्या. वायू आणि जल प्रदूषणाविरुद्ध काम केल्यामुळे त्यांना अनेक लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला.