Brilliant performance in karate competition : The World’s players qualify for the regional competition भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : जळगाव जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमधील 14 वर्ष वयोगटातील सहावीतील विद्यार्थिनी नंदिनी चावरिया तसेच सातवीतील सृष्टी बर्हाटे, आसावरी खंडारे या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना वेळोवेळी क्रीडा शिक्षक सुमित दास गुप्ता, शाळेच्या क्रीडा शिक्षिका अश्विनी पाल यांनी मागर्दर्शन केले. शाळेचे संचालक सी.ए.रोहित कोलते, शाळेच्या मुख्यध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांनी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.