K. Narkhede Computer Technology Institute in Bhusawal felicitates the new in-charge principal and supervisor भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : भुसावळ शहरातील के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत प्रभारी मुख्याध्यापिका संगीता अडकमोल तर पर्यवेक्षक म्हणून एस.पी.पाठक यांचा संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संगणक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांनी संस्थेच्या आणि शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या व संगणक विभागाच्या हिताच्या दृष्टिकोनातून उपस्थितांना काही महत्त्वाच्या व आवश्यक सूचना केल्या.
प्रभारी मुख्याध्यापिका संगीता अडकमोल व सुनील पाठक यांनी संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील तसेच उपस्थितांचे सत्काराबद्दल आभार मानले.