सागवान लाकडाची तस्करी उधळली : आरोपी पसार मात्र 52 हजारांचा मुद्देमाल यावल तालुक्यात जप्त

Illegal teak wood smuggling uncovered near Korpavali : Suspected smuggler, goods worth Rs 52 thousand seized यावल (3 ऑक्टोबर 2025) : अवैधरित्या सागवानी लाकडाची वाहतूक होत असताना वनविभागाने कारवाई केली मात्र संशयीत दुचाकी तसेच सागवान लाकूड सोडून पसार झाले. 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गस्तीदरम्यान पथकाची कारवाई
शुक्रवार, 3 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना कोरपावली गावात दोन संशयीत दुचाकीवरून सागवान लाकूड नेत असताना पथकाने पाठलाग केला मात्र संशयीत वाहन सोडून पसार झाले तर 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी तसेच 11 हजार 200 रुपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव व यावल उप वनसंरक्षक, धुळे विभागीय वनअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गस्ती पथक इंदल.बी चव्हाण, पोलीस एस.आर तडवी, वाहन चालक योगीराज तेली व सचिन चव्हाण आदींच्या पथकाने केली.