भुसावळातील भोळे महाविद्यालयात बँकिंग व्यवहार व सायबर सुरक्षेवर व्याख्यान

Government provides loan facility of Rs 10 lakhs to help young women become self-reliant: Pratap Khemnar भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व विद्यार्थी विकास विभाग युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत 27 सप्टेंबर रोजी सेंट्रल बँक भुसावळ शाखेतील शाखा अधीक्षक प्रताप खेमनार यांनी बँकीग व्यवहार व सायबर सुरक्षा या विषयी युवतींना माहिती दिली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्राचार्य डॉ.राजू फालक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी व युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी उपस्थित होत्या.

प्रताप खेमनार यांनी बँकामधील विविध खात्यांचे प्रकार, विद्यार्थ्यांसाठीचे झिरो बॅलन्स खाते, केवायसीची गरज, बँकांचे राष्ट्रीयकरण, मनी लाँड्रींग आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

युवतींसाठी शैक्षणिक कर्ज, महिला सक्षमीकरणासंबंधी बँकांनी राबवलेल्या योजना, युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाखापर्यत कर्जाची सुविधा याची माहिती दिली. सायबर फ्रॅाड, फिशींग यासंबंधी घ्यावयाची काळजी तसेच परदेशी चलन उपलब्धतेची माहिती दिली.

फसव्या लिंकला टीक न करण्याचे आवाहन
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी युवतींनी बँकेचे व्यवहार काळजीपूर्वक करावे, ओटीपी शेअर करतांना काळजी घ्यावी, फसव्या लिंक व आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन केले.

प्रास्ताविक प्रा.संगीता धर्माधिकारी तर सूत्रसंचालन डॉ.माधुरी पाटील तर आभार प्रा.डॉ.जयश्री पी.सरोदे यांनी मानले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.संजय डी.चौधरी, डॉ.अंजली के.पाटील, प्रा.श्रेया एन.चौधरी उपस्थित होत्या.