नाहाटा महाविद्यालयात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन

Birth anniversaries of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri celebrated at PU Nahata College, Bhusawal भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळ, मराठी विभाग व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच. बर्‍हाटे,उ पप्राचार्य डॉ.दीपक पाटील, डॉ.जी.आर.वाणी यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

गांधीजींनी दिला सत्य अहिंसेचा संदेश
प्रा.सतीश अहिरे म्हणाले की, आजच्या युगात महात्मा गांधी यांच्या विचारांची नितांत गरज आहे. गांधीजींनी जगाला सत्य आणि अहिंसेचा अद्वितीय संदेश दिला. समाजात वाढत चाललेली हिंसा, द्वेष आणि असमानता दूर करण्यासाठी त्यांच्या विचारांचा आधार घ्यावा लागेल.

स्वच्छता, शिस्त आणि साधेपणाचे तत्त्व त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. अन्यायाविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढा देणे हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. ‘स्वदेशी’चा मंत्र देऊन त्यांनी आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून दिले. गरीब आणि शोषितांची सेवा करणे हेच खर्‍या राष्ट्रनिर्माणाचे साधन आहे असे ते सांगत. पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे साधेपणाचे तत्त्व आजही मार्गदर्शक आहे. म्हणूनच गांधीजींचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या समाजासाठीही अत्यंत आवश्यक आहेत.

प्रास्ताविक डॉ.दीनानाथ पाठक तर सूत्रसंचालन डॉ.प्रफुल्ल इंगोले व आभार डॉ.मनोज पाटील यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ.राजेंद्र तायडे, डॉ.स्वाती महाजन, प्रा.वंदना महाजन, प्रा.गौतम भालेराव, प्रा.मनोहर गायकवाड, डॉ.सचिन राजपूत, कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे आदींनी परिश्रम घेतले.