Father of the Nation Mahatma Gandhi Jayanti and Lal Bahadur Shastri Jayanti celebrated with enthusiasm at Sakegaon Gurukul भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महात्मा गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गांधीजींचे ‘सत्य व* अहिंसा’ यांचे विचार मांडले.
‘जय जवान, जय किसान’ या लालबहादूर शास्त्रीजींच्या घोषणेचे महत्त्व उलगडून सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत देशभक्तीपर गीते, भाषण यांचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ भगत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महात्मा गांधीजी व शास्त्रीजींचे कर्तृत्व विद्यार्थ्यांसमोर ठेवले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. गांधीजींच्या स्वच्छतेच्या संदेशाला अनुसरून शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवून त्यांना खरी आदरांजली वाहिली.
स्वच्छतेतून सद्गुणांचा वसा जपला जातो हा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, प्रणिता चौधरी तसेच शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.