Protest by beating drums outside MLA Javale’s house to include Dhangar community in Scheduled Caste यावल (2 ऑक्टोबर 2025) : धनगर समाजाला अनुसुचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी यावल शहरातील भुसावळ टि पॉईंट येथे रास्तारोका आंदोलन तसेच तालुक्यातील भालोद येथे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानासमोर ढोल वाजवून यावल तालुक्यातील सकल धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी जालना येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणास पाठींबा दिला आहे. शहरातून मार्गस्त होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील भुसावळ टी-पॉईंटवर बुधवारी सकाळी तालुक्यातील सकल धनगर समाजबांधव एकत्र आले व त्यांनी या ठिकाणी रास्तारोको केला. जालना येथे सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांच्या वतीने अनुसुचित जमातीच्या यादितील नोंद क्र 36 मधील धनगड या नावा ऐवजी धनगर असे वाचावे असा शासन आदेश तात्काळ काढावा व धनगर समाजाला एस. टी. आरक्षण द्यावे देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दिला.
आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
मोठ्या संख्येत एकत्र आलेल्या धनगर समाज बांधवांनी घोषणा देत नागरीकांचे लक्ष वेधले व या मागणीचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार अतुल गांर्गुडे, पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांना दिले. या आंदोलनामुळे काही वेळ अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प् झाली. प्रसंगी आंदोलनात तालुक्यातील सकल धनगर समाज मोठ्या संख्येत एकत्र आला.
ढोल वाजवून आमदारांच्या निवासस्थानी आंदोलन
भालोद, ता.यावल येेथे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानी जावुन देखील धनगर समाज बांधवांनी ढोल वाजवून आंदोलन केले व त्यांना निवेदन देत विधान भवनात सातत्याने धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावे म्हणून पाठपुरावा करण्याची विनंती केली.