महिलेवर लैंगिक अत्याचार : समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

Rape of a young woman in Bhusawal : Demand for strict action against the culprit भुसावळ (25 सप्टेंबर 2025) : शहरात गतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. बुधवारी दुपारी समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना यांना निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन
शहरातील एका भागातील दिव्यांग गतीमंद महिलेवर झालेल्या अत्याचाराविरूध्द येथील समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे बुधवारी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा आशय असा की, संशयीतावर कडक कारवाई करून त्याला शिक्षा करण्यात यावी. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, संस्थेचे अध्यक्ष दीपक कुळकर्णी, आय.जी.जैन, विनोद गायकवाड, लतेश कोल्हे, गोकुळ बाविस्कर व करुणा सातदिवे यांच्यासह संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते.