भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रीजींना अभिवादन

भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले.

विद्यालयातील सातवी फ ची विद्यार्थिनी भाविका अमोल वाणी हिने महात्मा गांधी यांच्या संदर्भात तर सहावी फ चा विद्यार्थी श्लोक संदीप शेटे याने लाल बहादूर शास्त्री यांच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यालयातील सकाळ शाखेच्या उपशिक्षिका मनीषा सोनवणे यांनी केले. याप्रसंगी विद्यालय व विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.े