भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल माहिती दिली. स्वच्छता अभियान विद्यालयात राबवण्यात आले. स्वच्छता अभियानात प्रधानाध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. शिक्षकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा आपण जर अवलंबन केला तर आपली सर्वांगीण प्रगती होऊन देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन रीता शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन अमित चौधरी यांनी केले.