यावलला आयुष्यमान भारतकार्ड नोंदणी शिबिराला प्रतिसाद

यावल (2 ऑक्टोबर 2025) : यावल शहरातील विश्वज्योती चौकात विश्वज्योती दुर्गोत्सव मंडळातर्फे आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 75 कुटुंबियांनी नोंदणी केली. बुधवारी झालेल्या शिबिराला उत्सत प्रतिसात मिळाला. सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत यावेळी ही मुक्त नोंदणी करण्यात आली ओळखपत्राचे देखील लवकरच वितरण केले जाणार आहेत .

या शिबिराला उपस्थित पुरवठा अधिकारी अभिमन्यू चराटे, अकबर तडवी, दिलीप नेवे, शोभा बडगुजर, संजीदा बी.आसीफ खान, नितीन माहुरकर यांची उपस्थितीहोती. मंडळाचे अध्यक्ष गोपाल चौधरी यांनी शिबिराबाबत जनजागृती केली.