भुसावळातील द वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला दसरा सण

Burning of Ravana at The World School in Bhusawal भुसावळ  (2 ऑक्टोबर 2025) :  कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये दसरा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यॅसेट यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी दसर्‍याचे प्रयोजन सांगितले. इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रभू श्री रामचंद्र सीता माता, पवनपुत्र हनुमान यांच्या नावाचा जयघोष करत आपला आनंद द्विगुणित केला. हा कार्यक्रम पेट्रिश्या ह्यसेट यांच्या मर्दगर्शनखाली पार पडला. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.